महाराष्ट्र सीईटी २०२५: परीक्षेच्या तारखा, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र सीईटी २०२५: परीक्षेच्या तारखा, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र CET सेल (Common Entrance Test Cell - www.mahacet.org) हे राज्य सरकारचे एक महत्त्वाचे संस्थान आहे, जे विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी परीक्षा आयोजित करते. खाली महाराष्ट्रातील CET परीक्षांची माहिती, संबंधित अभ्यासक्रम आणि 2025 साठी परीक्षांचे वेळापत्रक दिले आहे.

1. MHT-CET (Maharashtra Common Entrance Test)

  • अभ्यासक्रम:

    • BE/B.Tech (अभियांत्रिकी)

    • B.Pharm (फार्मसी)

    • B.Sc Agriculture (कृषी)

  • पात्रता: १२ वी उत्तीर्ण (PCM किंवा PCB विषयांसह)

  • परीक्षा तारीख:

    • PCB गट: ९ एप्रिल २०२५ ते १७ एप्रिल २०२५ (१० व १४ एप्रिल वगळता)

    • PCM गट: १९ एप्रिल २०२५ ते २७ एप्रिल २०२५ (२४ एप्रिल वगळता)

2. MAH-MBA/MMS CET

  • अभ्यासक्रम: MBA/MMS (Master of Business Administration/Management Studies)

  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ५०% गुण; आरक्षित प्रवर्गासाठी सवलत लागू)

  • परीक्षा तारीख: १७ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५

3. MAH-B.Ed CET

  • अभ्यासक्रम: B.Ed (Bachelor of Education)

  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • परीक्षा तारीख: २४ मार्च २०२५ ते २६ मार्च २०२५

4. MH-CET Law

  • अभ्यासक्रम:

    • BA LLB (५ वर्षे एकत्रित कोर्स)

    • LLB (३ वर्षे कोर्स)

  • पात्रता:

    • BA LLB साठी: १२ वी उत्तीर्ण (किमान ४५% गुण; आरक्षित प्रवर्गासाठी सवलत लागू)

    • LLB साठी: कोणत्याही शाखेतील पदवीधर

  • परीक्षा तारीख:

    • ३ वर्षे LLB: २० मार्च २०२५ व २१ मार्च २०२५

    • ५ वर्षे LLB: ४ एप्रिल २०२५

5. MAH-B.HMCT CET

  • अभ्यासक्रम: B.HMCT (Bachelor of Hotel Management and Catering Technology)

  • पात्रता: १२ वी उत्तीर्ण (किमान ४५% गुण; आरक्षित प्रवर्गासाठी सवलत लागू)

  • परीक्षा तारीख: २७ मार्च २०२५

6. MAH-M.Arch CET

  • अभ्यासक्रम: M.Arch (Master of Architecture)

  • पात्रता: B.Arch पदवीधर

  • परीक्षा तारीख: २७ मार्च २०२५

7. MAH-AAC CET

  • अभ्यासक्रम: BFA (Bachelor of Fine Arts), Bachelor of Design

  • पात्रता: १२ वी उत्तीर्ण (कला क्षेत्रासाठी विशेष पात्रता गरज लागू)

  • परीक्षा तारीख: ५ एप्रिल २०२५

8. MAH-B.Planning CET

  • अभ्यासक्रम: B.Planning (Bachelor of Planning)

  • पात्रता: १२ वी उत्तीर्ण (गणित विषय आवश्यक)

  • परीक्षा तारीख: २८ मार्च २०२५

9. MCA CET

  • अभ्यासक्रम: MCA (Master of Computer Applications)

  • पात्रता: संगणक विज्ञान किंवा संबंधित शाखेत पदवी (गणित विषय आवश्यक)

  • परीक्षा तारीख: २३ मार्च २०

------------------------------------------

आवश्यक कागदपत्रे:

  • सर्वसासाधारण कागदपत्रे:
    1. १० वी व १२ वीचे गुणपत्रक 

    2. पदवी गुणपत्रक 

    3. फोटो आयडी प्रूफ (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.)

    4. रहिवाशी प्रमाणपत्र (Domicile Certificate)

  • आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष कागदपत्रे:

    1. जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

    2. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)

    3. नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) - ओबीसी, व्हीजेएनटी यांच्यासाठी लागू

  • इतर विशेष कागदपत्रे (लागू असल्यास):

    1. शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate) - अपंग विद्यार्थ्यांसाठी

    2. सक्षम प्राधिकरणाकडून मिळालेले कोणतेही विशेष प्रमाणपत्र

------------------------------------------

CET अर्ज प्रक्रिया:

CET अर्ज प्रक्रिया सामान्यत: परीक्षेच्या 3-4 महिन्यांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट (www.mahacet.org) वरून अर्ज करू शकतात. खालील तारखा अर्ज सुरू होण्याच्या अंदाजे तारखा आहेत:

  • MHT-CET: डिसेंबर 2024

  • MAH-MBA/MMS CET: नोव्हेंबर 2024

  • MAH-B.Ed CET: डिसेंबर 2024

  • MH-CET Law: जानेवारी 2025

  • MCA CET: डिसेंबर 2024

विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. वेळेवर अर्ज करा: CET परीक्षांच्या तारखा आणि सूचना CET सेलच्या अधिकृत वेबसाइटवर (www.mahacet.org) उपलब्ध असतात.

  2. अभ्यासक्रम निवडा: आपली आवड, क्षमता, आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य अभ्यासक्रम निवडा.

  3. तयारी करा: CET परीक्षांच्या स्वरूपानुसार अभ्यासक्रमाची तयारी करा.

  4. तुमची काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल करा. (support@mahaok.in)

------------------------------------------

महत्वाच्या लिंक्स 

सीईटी सेल अधिकृत वेबसाईट - क्लिक करा

महाओके वेबसाईट - क्लिक करा

महाओके प्रवेश प्रक्रिया ग्रुप - क्लिक करा

 

Sign up to receive email updates, fresh news and more!